मुंबई: तौक्ते चक्रिवादळाच्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन पाहणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? असा थेट सवाल भाजपने उपस्थित केला आहे. कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट आणि मुख्यमंत्री मात्र घरात बसलेत, अशा शब्दात भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (when will the chief minister do work from mantralay bjp targets chief minister )

अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना work from home करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असे एकावर एक सवाल भाजपचे प्रवक्ते यांनी उपस्थित केले आहेत.

‘मुख्यमंत्री तर वर्क फ्रॉम होममिनिस्टर झाले आहेत’

भाजपचे प्रवक्ते उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ असा केला आहे. ते आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे.’

क्लिक करा आणि वाचा-

अजित पवार यांनी केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट देत तौक्ते चक्रिवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीची पूर्ण माहिती घेतली. तसेच बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा देखील त्यांनी आज आढावा घेतला.

क्लिक करा आणि वाचा-
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि माहिती घेत उपयुक्त सूचना केल्या. त्याच प्रमाणे त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील दूरध्वनीवरुन संपर्क साधला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here