भारताचे सर्व खेळाडू सध्याच्या घडीला मायदेशात आहेत. पण पुढच्या महिन्यात भारतीय संघ इंग्लंडमध्ये रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. भारतीय संघ गेल्या ८९ वर्षांत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्यासाठी पहिल्यांदा उतरणार आहे.
आयसीसीने ज्या देशांना कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला आहे त्यांच्यापैकी फक्त दोन देश असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळलेले नाहीत. या दोन देशांमध्ये भारत आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. कारण आतापर्यंत आयसीसीच्या उर्वरीत १० देशांनी तरी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळलेले आहेत. आता भारतीय संघ पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १८ जूनपासून विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताचे सर्व खेळआडू १९ मे या दिवशी मुंबईमध्ये एकत्र येणार आहेत. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे समजते आहे आणि त्यानंतर ते इंग्लंडला रवाना होणार आहेत.
१०९ वर्षांपूर्वी तटस्थ ठिकाणी खेळवला होता कसोटी सामनातटस्ठ ठिकाणी पहिला कसोटी सामना हा १०९ वर्षांपूर्वी खेळवला गेला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झाला होता. हा सामना २७ मे १९१२ या दिवशी सुरु झाला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना दोन दिवसांतच जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर एक डाव आणि ८८ धावांनी विजय मिळवला होता. ही एक तिरंगी मालिका होती, ज्याचे यजमानपद इंग्लंडकडे होते. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे तीन देश खेळले होते. त्यानंतर १९९९ साली तटस्ठ ठिकाणी कसोटी सामने खेळवण्यात आला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times