मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टने केलेल्या वक्तव्यामुळे २०१८ सालचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चेंडूशी छेडछाड केलेल्या या क्रिकेटपटूने द गार्जियनला दिलेल्या मुलाखतीत तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मी सोडून गोलंदाजांना देखील याची कल्पना होती असे म्हटले.

वाचा-

बॅनक्रॉफ्टने केलेल्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समितीने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या बॅनक्रॉफ्टशी संपर्क केल्याचे वृत्त समोर येत आहे. अशात ऑस्ट्रेलियाच्या दोन माजी क्रिकेटपटूंनी बोर्डाला चार शब्द सुनावले आहेत. या प्रकरणी अॅडम गिलख्रिस्ट आणि मायकल क्लार्क यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा-

गिलख्रिस्टचा क्रिकेट ऑस्ट्रेलियावर गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज विकेटकीपर आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट म्हणाला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बॉल टॅम्परिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रकरणाची चर्चा वारंवार होणार. मला वाटते की अनेक नावे पुन्हा पुन्हा समोर येतील. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा लोक हा मुद्दा उपस्थित करतील. मला वाटते यासाठी जबाबदार आहे. सीएला कठोर संदेश देण्याची गरज होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून काय झाले होते हे जाणून घ्यायला हवे होते. मला वाटत नाही की क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असे करायचे आहे. त्यांना अधिक खोलात जायचे नाही.

वाचा-

क्लार्क म्हणाला…

बॉल टॅम्परिंगबद्दल तिघांपेक्षा अधिक खेळाडूंना माहिती होती या बॅनक्रॉफ्टच्या वक्तव्याने मला वाटत नाही कोणाला धक्का बसला असेल. बेनक्रॉफ्टच्या खुलाशाने हैराण होण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने थोडेफार क्रिकेट खेळले आहे किंवा ज्याला क्रिकेटबद्दल थोडे फार माहीती आहे अशी व्यक्ती हैराण होणार नाही.

वाचा- – सचिन तेंडुलकर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे. जेणेकरून याबद्दल आणखी कोणाला माहिती होती हे कळू शकेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here