नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला याची आणखी एक युक्ती अपयशी ठरली आहे. राष्ट्रपतींद्वारे विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फाशी टाळण्याची मागणी करणारे विनयची याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगत आपल्याला फाशी देऊ नये अशी मागणी विनयने सुप्रीम कोर्टात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र विनय हा मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी सुनावणीनंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता.
न्यायमूर्ती अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना यांच्यासह न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर काल (गुरुवार) आपला निर्णय राखून ठेवला होता. राष्ट्रपतींनी निर्भया प्रकरणीतील एक दोषी विनय शर्मा यांची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्या प्रक्रियेला विनयने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर कोर्ट आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले. मेहता केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times