वाचा:
तौत्के चक्रीवादळ सध्या मुंबईपासून समुद्रात १४५ किलोमीटर दूर आहे. मात्र त्याचा मोठा प्रभाव मुंबईत जाणवत आहे. मुंबईत वादळी वारे आणि पावसाने धुमाकूळ घातला आहे. आधीच कोविडशी लढा सुरू असताना वादळामुळे दुहेरी संकट मुंबईवर कोसळलं आहे. या स्थितीत महापालिकेची यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे. मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता लक्षता घेऊन येणाऱ्या स्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी माहिती दिली. मुंबईत दोन दिवस आधीच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याने आज स्थिती नियंत्रणात राखता आली. काही ठिकाणी झाडांची व घरांची पडझड झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याची सूचना दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
वाचा:
खबरदारी म्हणून शनिवारीच तसेच मुलुंड व दहिसरच्या कोविड सेंटरमधून ५८० रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आले होते. त्यामुळे आज प्रत्यक्ष वादळावेळी तेथील स्थिती सामान्य आहे, असे काकाणी यांनी नमूद केले. बीकेसी जम्बो कोविड सेंटरच्या संरचनेचे वादळी वाऱ्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. या कोविड केंद्राची मुख्य संरचना स्थिर आहे. प्रतीक्षालयातील छताला वादळामुळे हानी पोहचू नये म्हणून प्रशासनाने स्वतःच प्रतीक्षालय काढून ठेवले आहे. वादळ व पाऊस ओसरताच बीकेसी कोविड सेंटरमध्येय स्वच्छतेसह प्रतीक्षालय पूर्ववत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.
वाचा:
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
किनाऱ्यावर एनडीआरएफची तीन आणि कोस्टगार्डची दोन पथके तैनात आहेत. मात्र, सुदैवाने अद्याप कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळही आली नाही. वादळाचा केंद्रबिंदू आता पालघरच्या पुढे सरकल्याने रात्रीपर्यंत स्थिती निवळेल, अशी आशा आहे मात्र आम्ही सतर्क राहणार आहोत. उद्यापर्यंत अॅलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत, असे काकाणी यांनी सांगितले. वादळी वारे आणि पाऊस लक्षात घेता कुणीही गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडावे लागलेच तर कोविडचे सर्व नियम पाळा, असे आवाहनही काकाणी यांनी केले. मुंबईत वाऱ्याचा वेग ताशी १२० कि.मी. पर्यंत जाण्याची शक्यता असून पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times