नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळलेले काही सामने फिक्स होते, असा दावा एका वृत्तसंस्थेने केला होता. त्यानंतर भारताचे कसोटी सामने खरेच फिक्स होते का, यावर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) याबाबत चौकशी केली असून आता याबाबतचे सत्य समोर आले आहे.

अल जजिरा या वृत्तवाहिनीने यापूर्वी एक दावा केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, ” इंग्लंडचा संघ २०१६ साली जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा एक सामना फिक्स करण्यात आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एक संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होता, तेव्हादेखील एक सामना फिक्स करण्यात आला होता. याबाबत अल जजिराने एक डॉक्यूमेंट्री बनवली होती आणि त्यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आली होती.”

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये २०१६ साली चेन्नईमध्ये एक कसोटी सामना झाला होता. हा कसोटा सामना फिक्स करण्यात आला होता, असे या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले आहेत. यानंतर म्हणजेच पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रांची येथे एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. यावेळी मॅच फिक्सिंग करण्यात आली होती, असा दावा अल जजिराने केला होता.

‘क्रिकेट्स मैच फिक्सर्स’ अशी डॉक्यूमेंट्री अल जजिराने २०१८ साली प्रसिद्ध केली होती. या कार्यक्रमात सट्टेबाज अनिल मुनव्वरच्या काही गोष्टी कैद झाल्या होत्या. त्यावेळी अनिलने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे दोन सामने फिक्स करण्यात आले होते, असे म्हटले होते. आयसीसीने यावेळी सर्व गोष्टींची चाचपणी केली. त्याचबरोबर यावेळी चॅनेलने ज्या गोष्टी दाखवल्या होत्या, त्याचा आयसीसीने अभ्यास केला. त्याचबरोबर या कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या आयसीसीने क्लीन चिट दिली आहे. त्याचबरोबर आयसीसीने यावेळी सांगितले आहे की, ” या पाच जणांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. पण या पाच जणांच्या विरोधात कोणाताही पुरावा सापडलेला नाही.” त्यामुळे आयसीसीने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून भारताचे हे दोन सामने फिक्स नव्हते, असा निर्णय त्यांनी दिला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here