मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाचा आलेख उतरता राहिला असून आज दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. क्षेत्रात गेल्या २४ तासांत १ हजार २४० नवीन रुग्णांची भर पडली असून ९ मार्चनंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. ( )

वाचा:

मुंबई महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज १ हजार २४० नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी २ हजार ५८७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. गेल्या २४ तासांत मुंबईत ४८ रुग्ण दगावले असून आतापर्यंत या आजाराने १४ हजार ३०८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के झाले असून रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्के इतका खाली आला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल २४६ दिवसांवर गेला आहे. सध्या करोनाचे ३४ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज करोनाच्या एकूण १७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या, अशी माहितीही देण्यात आली. मुंबईत चाळी व झोपडपट्टीत सध्या ७७ आहेत तर ३११ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

वाचा:

सलग पाच दिवस रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा कमी

मुंबईतील करोनाचा ग्राफ खाली येत आहे. कालच्यापेक्षा आज मुंबईत जवळपास ३०० रुग्णांची घट झाली तर मृतांचा आकडाही घटला. रविवारी मुंबईत १ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले होते व ६० रुग्ण दगावले होते. त्याजागी आज १ हजार २४० नवीन रुग्ण आढळले तर ४८ जणांचा मृत्यू झाला. सलग पाच दिवस मुंबईत २ हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ४ एप्रिल रोजी एकाच दिवसात ११ हजार १६३ इतकी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here