मुंबई: चक्रीवादळाच्या तडाख्याने आज मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासूनच मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढला आणि पावसाचा जोरही वाढला. दुपारी भागात वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटरपर्यंत पोहचला होता. या वादळाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. शहर आणि उपनगरात ४७९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. त्याचवेळी २६ ठिकाणी घरे तसेच घराच्या भिंतीचा भाग कोसळला तर काही सखल भागांत पाणीही भरले. दरम्यान, पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. ( )

वाचा:

तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. आज संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

वाचा:

मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.

वाचा:

दोन बोटी बुडाल्या; दोन जण बेपत्ता

चेंबूर सूमननगर येथे घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंतीचा भाग कोसळून ४ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आश्रय माळी, सुदर्शन माळी, आकाश माळी, सागर हनुमान अशी जखमींची नावे आहेत. बोरीवलीत काजूपाडा भागात क्रेनचा भाग घरावर पडून त्यात कुंदा सकपाळ, सागर सकपाळ, देवयानी सकपाळ असे तीन जण जखमी झाले. अंधेरीतील गणेशनगर सोसायटी येथे घराचा भाग कोसळून त्यात एक महिला जखमी झाली. येथे बोट फुटून त्यातील ५ जण बुडाले होते. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे. समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. माहीम कॉजवेच्या मागे रेती बंदर येथे एका बोटीचा अँकर तुटून बोट समुद्रात गेली. या बोटीतील ५ जण बुडाले होते. त्यातील दोन जण पोहून किनारी आले आहेत. एक जण बुडाल्याची शक्यता आहे तर अन्य दोघे सुखरूप असावेत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here