सिंधुदुर्ग: चक्रीवादळाचा जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या वादळात कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून त्याच्या भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा झाली असून लवकरच नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. वादळात सापडलेल्यांना प्रशासन वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत तर मिळेलच पण शिवसेनेच्या वतीनेही मंगळवारपासून आवश्यक ती मदत देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ( )

वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे २०६० घरांचे नुकसान झाले आहे. तर गुरांचे १३९ गोठे आणि १९ शाळांचे नुकसान झाले आहे. अधिक नुकसान मालवण तालुक्यात झाले असून तालुक्यातही नुकसानीचा आकडा वाढताच आहे. जिल्ह्यातील ४६० विद्युत वाहिन्या तुटल्या असून ८८० विजेचे खांब कोसळले आहेत. महावितरणचे एकूण पावणे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणची सेवा पूर्ववत करण्यासाठी भांडुप, बारामती, सातारा, कोल्हापूर येथून तंत्रज्ञांच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. संध्याकाळपासून महावितरणची सेवा काहीशी पूर्ववत होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन नागरिकांना दिले. मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्या फाटलेल्या जाळ्या आणि अन्य नुकसानीची भरपाई विनाविलंब देण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.

वाचा:

सिंधुदुर्ग काळोखात, नेटवर्कही गुल

तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दोडामार्ग, , वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या सर्वच तालुक्यांना वादळाचा मोठा बसला आहे. या सर्व ठिकाणी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून पावसाळ्याआधीच अनेक कुटुंबांवर भीषण संकट कोसळलं आहे. विजेचे खांब मोठ्या प्रमाणात कोसळल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. नेटवर्कही अनेक ठिकाणी गायब झाले आहे. या सर्वातून सावरण्यासाठी पुढचे काही दिवस जाणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here