वाचा:
सौरभ राव यांना दोन दिवस ताप आल्याने त्यांनी चाचणी करून घेतली. सोमवारी सायंकाळी त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री यांनी कौन्सिल हॉल येथे करोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीला राव हे उपस्थित होते. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यापासून गेल्या सुमारे २० दिवसांपासून ते प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या कार्यालयातून नियोजन करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली आहे. आता राव यांना पुन्हा करोना झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन लगेचच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, पुणे विभागाला करोनाचा आजवर सर्वाधिक फटका बसला आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात सातत्याने आव्हानात्मक स्थिती राहिली आहे. या आघाडीवर काम करताना सौरभ राव हे नेहमीच कर्तव्यदक्ष राहिले आहेत. पुण्याच्या कोविड लढ्याला त्यामुळेच बळ मिळू शकलं आहे. या लढ्यात खुद्द राव यांना मात्र आता परत एकदा करोनाशी सामना करावा लागला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times