फ्लोरिडा: अमेरिकेत पार पडलेल्या ” सौंदर्यवती स्पर्धेत म्यानमारमधील लष्करी हुकुमशाहीविरोधात आवाज उठवला गेला. म्यानमारची सौंदर्यवती थुजार विंटने पोस्टर झळकावून आपल्या देशात निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या जात असल्याचे म्हटले. म्यानमारमध्ये एक फेब्रुवारी रोजी लष्कराने सत्ता हाती घेतली. त्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनावर लष्कराने दडपशाही सुरू केली आहे.

फ्लोरिडामधील सेमिनोले हार्ड रॉक हॉटेलमध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी मिस थुजार विंटने पोस्टर झळकावले. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये थुजार विंटने आमच्या देशात नागरिकांवर लष्कर गोळ्या झाडत असून त्यांची हत्या होत असल्याचे म्हटले. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत थुजार विंटने संपूर्ण जगाला म्यानमारच्या नागरिकांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले.

वाचा:

या स्पर्धेत थुजार विंटला बेस्ट नॅशनल कॉश्चयुमचा पुरस्कार मिळाला. म्यानमारच्या लष्कराकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. म्यानमारमधील लष्करशाहीवर काही सेलिब्रेटींसने आवाज उठवला आहे. या यादीत आता थुजार विंटचाही समावेश झाला आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन सुरू असून आतापर्यंत ७०० हून अधिकजण गोळीबारात ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. तर, पाच हजारांहून अधिकजणांना अटक करण्यात आली होती.

वाचा:
दरम्यान, मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची ‘मिस इंडिया’ अ‍ॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे. मागील वर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here