नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांतील देशातील करोना आकडेवारीवर नजर टाकली तर देशात दररोज दाखल होणाऱ्या करोना कमालीच्या वेगानं खाली घसरताना दिसून येतोय मात्र याच वेळेस मृतांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेत भर टाकणारी आहे.

मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी (१७ मे २०२१) २ लाख ६३ हजार ५३३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४३१९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ७८ हजार ७१९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३३ लाख ५३ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२
  • उपचार सुरू : ३३ लाख ५३ हजार ७६५
  • एकूण मृत्यू : २ लाख ७८ हजार ७१९
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १५ लाख १० हजार ४१८ लसीचे डोस सोमवारी देण्यात आले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३१ कोटी ८२ लाख ९२ हजार ८८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ६९ हजार २२३ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात सोमवारी करण्यात आली.


प्रत्येक दिवशी दाखल होणारी रुग्णसंख्या

४ मे : ३,५७,२२९
५ मे : ३,८२,३१५
६ मे : ४,१२,२६२
७ मे : ४,१४,११८
८ मे : ४,०१,०७८
९ मे : ४,०३,७३८
१० मे : ३,६६,१६१
११ मे : ३,४८,४२१
१२ मे : ३,६२,७२७
१३ मे : ३,४३,१४४
१४ मे : ३,२६,०९८
१५ मे : ३,११,१७०
१६ मे : २,८१,३८६
१७ मे : २,६३,५३३

प्रत्येक दिवशीची मृत्यूसंख्या
४ मे : ३४४९
५ मे : ३७८०
६ मे : ३९८०
७ मे : ३९१५
८ मे : ४१८७
९ मे : ४०९२
१० मे : ३७५४
११ मे : ४२०५
१२ मे : ४१२०
१३ मे : ४०००
१४ मे : ३८९०
१५ मे : ४०७७
१६ मे : ४१०९
१७ मे : ४३१९

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here