वाचा-
या सामन्यात भारताचे नेतृत्व आणि न्यूझीलंडचे नेतृत्व कडे आहे. WTC फायनल आधी या दोन्ही खेळाडूंमध्ये तुलना होत आहे. त्यात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराटपेक्षा केन महान फलंदाज असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली. या वादात अनेकांनी उडी घेतली असून जाणून घेऊयात ज्या दोन खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे त्याची आकडेवारी….
विराट कोहलीचे कसोटीतील नेतृत्व
विराटने भारतीय संघाचे ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. ज्यातील ३६ सामने जिंकले आहेत तर १४ मध्ये पराभव झालाय. १० कसोटी सामने ड्रॉ झालेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराट भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०९ मध्ये त्याने महेंद्र सिंह धोनीचा सर्वाधिक विजयाचा विक्रम मागे टाकला. सध्या कोहलीने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. लॉयड यांनी वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना ३६ सामने जिंकले होते.
वाचा-
केनचे कसोटीमधील नेतृत्व
केन विलियमसनला चतुर कर्णधार मानले जाते. २०१६ साली त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्याने ३५ कसोटीत नेतृत्व केले असून त्यापैकी २१ सामन्यात विजय तर ८ मध्ये पराभव झालाय. ६ कसोटी सामने ड्रॉ झालेत.
घरच्या मैदानावरील कामगिरी
कोहलीने घरच्या मैदानावर झालेल्या ३० लढतीपैकी २३ लढतीत विजय मिळवला आहे. तर फक्त दोन लढतीत पराभव झालाय. विलियमसनने घरच्या मैदानावर २२ पैकी १६ कसोटीत विजय मिळवला आहे. फक्त एकात पराभव तर ५ सामने ड्रॉ झाले आहेत. कोहलीने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नाही तर विलियसमनने एक मालिका गमावली आहे.
वाचा-
परदेशातील कामगिरी
विलियमसनने परदेशात १० कसोटी न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळालाय. तर ६ मध्ये पराभव झाला. विराटने भारताचे परदेशात ३० कसोटीत नेतृत्व केले आहे. त्यापैकी १३ लढतीत विजय तर १२ मध्ये पराभव झालाय. विराट हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलियात कसोटीत मालिका विजय मिळवला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times