राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले की, एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच सर्व ५० राज्यांमध्ये करोनाबाधितांमध्ये घट होत असल्याचे दिसून आले. तर, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही ८१ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वाढला. तीन कोटीहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली होती. तर, पाच लाख ८६ हजारजणांना करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. बायडन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर मास्क अनिवार्य करण्यासह लसीकरण मोहिमेलाही वेग दिला. अमेरिकेत अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले.
वाचा:
वाचा:
दरम्यान, करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना अमेरिका जगातील अन्य देशांना दोन कोटी लस देणार आहेत. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी त्याबाबतची माहिती दिली. बायडन यांनी याआधी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस देण्याबाबतचे नियोजन केले होते. त्यानंतर आता यामध्ये फायजर आणि मॉडर्नाच्या लशींचाही समावेश करण्यात आला आहे. जून अखेरीस या लशी वितरीत करण्यात येणार आहे. अमेरिकेतील करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणल्यानंतर जगभरातून करोनाचा खात्मा करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times