बुलडाणा : जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्याच्या धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) पोहण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा धरणात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थ क्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे.

पुणे इथे जॉब करणारा विनायक गाडगे( वय २७ वर्षे) हा सध्या लॉकडाऊनमुळे धानोराला घरी आला होता. सोबत त्याच्या काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय १८ वर्ष) आणि मामा नामदेव वानखडे (वय ४३ वर्षे) हे तिघेजण काल दुसरी साडे तीन वाजताच्या सुमारास धानोरा लघु प्रकल्प परिसरात उन्हाळा असल्याने ते पोहण्यासाठी गेले होते.

रात्री उशिरापर्यंत तिघेजण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केला. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनलाही दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. तोपर्यंत रात्र झाल्याने अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नव्हता.

आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. गावात या घटनेने शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन वाकडे एएसआय लक्ष्मण गव्हाळे करत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here