मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचं एक ट्वीट केलं होतं. त्यानुसार सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खरंतर, याआधीही अनेक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे आता या कारवाईत नवीन काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
असं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तपास थंड होता. अशात किरीट सोमय्यांनी ट्वीट केल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. ईडी आणि सीबीआयकडून लोणावळा इथल्या एका रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला आहे. तिथे सध्या चौकशी आणि तपास सुरू असून काही वेळातच यातून महत्त्वाची माहिती समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली गेली. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार प्रताप सरनाईक हे प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या कंपनीत ब्रिटनहून मुंबई पोहोचलेल्या परदेशी निधीचा गैरवापर झाला, असा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) संशय आहे. याच अंतर्गत घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आले आहेत. सरनाईक यांच्या मुलाच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली होती. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची काही व्यवहारांबाबत सात तास चौकशी करण्यात आली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times