हार्दिकने मुलासोबतचा शेअर केला एक क्युट व्हिडिओ
हार्दिकने मुलगा अगस्त्यासोबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात अगस्त्या घरी वडिलांचे बोट धरून उभं राहण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वडील- मुलाचा हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहतेदेखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, हार्दिकने इन्स्टाग्राम रीलमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात हार्दिक मुलाला त्याच्या आलिशान घरात फिरवताना दिसत आहे. गोंडस अगस्त्यही वडिलांचे बोट धरून चालताना फार आनंदी दिसत आहे. या व्हिडिओवर अनुष्का शर्मा, केएल राहुल आणि सुनील शेट्टी यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नताशाने गेल्या वर्षी जानेवारीत हार्दिकशी लग्न केले होते. ३० जुलै रोजी नताशाने मुलगा अगस्त्यला जन्म दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times