मुंबई: प्रकरणातील आरोपी आणि प्रा. यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून चार आठवड्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे.

वाचा:

न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. जानेवारी २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा, तेलतुंबडे व अन्य काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींचे नक्षवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

वाचा:

डिसेंबर २०१७मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणं देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार उसळला होता. या परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

वाचा:

पुणे सत्र न्यायालयानं मागील वर्षीच्या नोव्हेंबर तेलतुंबडे व नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण देताना जामिनावरील निर्णय पुढं ढकलला होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here