तेल अवीव/ गाझा: मागील सात दिवसांपासून इस्रायल-पॅलेस्टाइनमधील हमास संघटना यांच्या संघर्ष सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले होत आहेत. तर, दुसरीकडे इस्रायलकडून गाझा शहरावर हवाई हल्ले सुरू आहेत. मागील सात दिवसांत गाझा पट्टीत ५८ बालके आणि ३४ महिलांसह २०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या संघर्षाचे विदारक चित्र समोर येत असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाझातील एक चिमुकली आपली वेदना मांडत असल्याचा हा व्हिडिओ आहे.

नादिन अब्देल तैफ असे या चिमुकलीचे नाव असून इस्रायलच्या हवाई हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ ती उभी आहे. आमच्यावर आणि जवळपासच्या लोकांवर का हल्ला केला जातोय असा प्रश्न तिने उपस्थित केला. मी आजारी असते. मी १० वर्षांची आहे. मी फार काही करू शकत नाही. मात्र, ही परिस्थिती चांगली करताना मी नेमकं काय करू असा आर्त प्रश्नही तिने केला. मला डॉक्टर व्हायचे आहे. जेणेकरून मी जखमींवर उपचार करू शकते. मात्र, सध्या मी लहान असल्यामुळे फार काही करू शकत असे नादिनने म्हटले.

वाचा:

वाचा:

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. गाझापट्टीतील लोकांबद्दल अनेक युजर्सने सहानुभूती व्यक्त केली आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याने युजर्सने चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांनी आणि पॅलेस्टाइनला संघर्ष थांबवण्यासाठी आवाहन केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here