मुंबई : () कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला भविष्यात पुन्हा आरक्षण देण्यात येऊ शकतं का, याबाबत राज्य सरकारकडून चाचपणी सुरू आहे. तसंच या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहे.

यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी ४ वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. या बैठकीला राज्य मंत्रिमंडळातील इतर अनेक मंत्रीही उपस्थिती राहणार आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत आगामी काळात नेमक्या कोणत्या पद्धतीने वाटचाल करायची, याबाबतची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भाजपकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येत असून या बैठकीला चंद्रकांत पाटील, नारायण राणे, आशिष शेलार आणि विनायक मेट यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.

संभाजीराजे उतरणार मैदानात
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक भाष्य केलं नाही. मात्र आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत देणारे ट्वीट त्यांनी केलं आहे. ‘मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन’, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.

दरम्यान, आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील विविध घटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच मराठा आरक्षण रद्द करणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बहुतांश राजकीय पक्षांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here