मुंबई : करोनाच्या धोक्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं. आता परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पडळकरांवर निशाणा साधला होता. त्यावर आता गोपिचंड पडळकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

भाई जगतापांची टीका
एमपीएसी परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. यावर त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे. खरंतर, एमपीएसी परीक्षा स्थगित केल्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाई जगताप यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, ‘राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा स्थगित केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का??’ अशा शब्दात जगताप यांनी गोपिचंद पडळकरांवर टीका केली आहे.

गोपिचंद पडळकरांचं प्रत्युत्तर
भाई जगताप यांच्या टीकेली पडळकरांनीही कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. नाव बदलल्याने जसं ‘#भाई’ होता येत नाही तसंच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येणार नाही असं पडळकरांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. सध्या दोघांच्या ट्वीटर वॉरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

गोपिचंद पडळकरांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही. काल चक्रीवादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’ असा थेट सवाल गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here