मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन चंद्रेशखर धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राबाहेरच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली होण्याच्या शक्यतेमुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

वाचा:

सत्यरंजन धर्माधिकारी हे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्यानंतरचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. मागील १६ वर्षांत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण निकाल व आदेश दिले. मुख्य न्या. नंदराजोग हे २४ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती मिळावी, अशी धर्माधिकारी यांची अपेक्षा असल्याची चर्चा होती. मात्र, मुंबई ऐवजी अन्य ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली केली जाणार असल्याचे संकेत त्यांना मिळाले होते. त्यामुळंच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. धर्माधिकारी यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडं राजीनामा पाठवला आहे.

‘अन्य एखाद्या राज्यात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीवर बदली होणार असली तरी मला माझ्या वैयक्तिक/कौटुंबिक कारणामुळे महाराष्ट्राबाहेर जाणे शक्य नव्हते. म्हणून मी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला,’ अशी माहिती धर्माधिकारी यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here