दुबई- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज कुणाल बेनोडेकरशी लग्न गाठ बांधली. वाढदिवसाच्याच दिवशी सोनालीने दुबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. विशे। म्हणजे तिच्या लग्नाला तिचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं.

जुलै महिन्यात साग्रसंगीत पद्धतीने सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध होणार होते. मात्र दोघांनी अचानक मे महिन्यातच लग्न करुन साऱ्यांना सुखद धक्का दिला. सोनालीने स्वतः सोशल मीडियावर अचानक लग्न का केलं याची सविस्तर माहिती दिली.

करोनाची सद्य परिस्थिती पाहता सोनाली आणि कुणालने लग्नात फारसा खर्च न करण्याचा निर्णय घेतलेला. जुलै महिन्यात लग्न करण्याचं जवळपास सर्वकाही ठरलंही होतं. पण मग साधेपणानेच लग्न करायचं असेल तर दोन महिने का थांबा असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी जुलैऐवजी मे महिन्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा सोनाली आणि कुणालने आजच्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सोनालीचे आई- वडील भारतात होते तर कुणालचे आई- वडील लंडनला होते. पुढच्या महिन्यात सोनालीचं इंग्लंडमध्ये लग्न होणार होतं. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लग्न जुलै महिन्यात ढकलण्यात आलं. पण शेवटी जुलै महिन्यात नातेवाईकांचा प्रवास, आरोग्याची घ्यावी लागणारी काळजी, अनावश्यक खर्च, सरकारी नियम या सर्व गोष्टी लक्षात घेता दोघांनी लग्न मे महिन्यातच करण्याचा निर्णय घेतला.

अवघ्या दोन दिवसांत सोनाली आणि कुणालने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तयारीही केली. एका तासात लग्नाची खरेदी केली आणि १५ मिनिटांत अवघ्या चार लोकांच्या साक्षीने मंदिरात वरमाळा, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी घेऊन विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. विशेष म्हणजे सोनाली आणि कुणालने लग्नासाठी वापरण्यात येणारी रक्कम करोना विरुद्धच्या मदतनिधीसाठी देण्याचा निश्चय केला आहे.

दरम्यान, कुणाल बेनोडेकर हा मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर अॅडजस्टर म्हणून काम करतो. गेल्या वर्षी याच दिवशी अर्थात सोनालीच्या वाढदिवसाला दोघांनी दुबईत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here