मुंबई: राज्यातील रुग्णवाढीला मोठ्या प्रमाणात ब्रेक लावण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपर्यंत रुग्णसंख्या खाली आली आहे. आज राज्यात २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५२ हजार ८९८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, करोना मृत्यूंचे प्रमाण ही आजही चिंतेची बाब असून गेल्या २४ तासांत राज्यात करोनाने ६७९ रुग्ण दगावले आहेत. ( )

वाचा:

राज्यातील करोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून ओसरताना दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनीही आज एका कार्यक्रमात बोलताना तसे विधान केले. त्याचवेळी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर आजची करोनाची आकडेवारी हाती आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आजही ३० हजारच्या खाली राहिली आहे.

वाचा:

करोनाची आजची स्थिती:

– राज्यात आज ६७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.
– आज २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान.
– ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळान नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.

वाचा:

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन आता ४ लाख १९ हजार ७२७ इतकी झाली आहे. त्यात सर्वाधिक ७२ हजार ८९ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत तर पालिका क्षेत्रात हा आकडा ३१ हजार ७९० पर्यंत खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या २८ हजार २५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात २६ हजार ७९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here