नवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं ( ) चित्र आहे. देशात करोनाच्या नवीन रुग्णसंख्या ७ मे ते आतापर्यंत २७ टक्क्यांनी कमी झाली आहे. यासोबत करोनामुक्त होण्याचा दर हा ८५ टक्क्यांवर गेला आहे. पण दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धोका वाढत असून यात लहान मुलांच्या जीवाला धोका आहे. यामुळे सरकारने तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेत करोनाचा ‘सिंगापूर व्हेरियंट’ अॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. ‘सिंगापूर व्हेरियंट’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे. करोनाचा ‘सिंगापूर व्हेरियंट’ लहान मुलांसाठी घातक ( ) असल्याचं बोललं जातंय.

सिंगापूर व्हेरियंटबाबत अधिकृत माहिती घेऊन त्यावर उत्तर उत्तर देऊ. लहान मुलांमध्येही करोनाचा संसर्ग होत असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. युवकांमध्ये याची लक्षणं दिसून येत नाही. पण मुलांना संसर्ग होतो आणि त्यांच्याकडून प्रादुर्भावही होऊ शकतो. पण मुलांमध्ये संसर्ग गंभीर स्वरुपाचा नसतो. अतिशय कमी केसेसमध्ये असे आढळून येते, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.

२ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोवॅक्सिनची ट्रायल सुरू होणार

भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्तविद्यमाने विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीच्या २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. यानुसार २ ते १८ वयोगटातील मुलांवरील कोवॅक्सिन लसीची चाचणी येत्या १० ते १२ दिवसांत सुरू होणार आहे. भारत बायोटेककडून ५२५ व्हॉलेंटियर्सवर ही चाचणी करणार आहे. ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे. यात लहान मुलांचे जीव वाचवण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. देशात लहान मुलांसाठी अद्याप करोनावरील एकही लस नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. पण सरकारने कोवॅक्सिनच्या चाचणीला मंजुरी दिल्याने देशातील लहान मुलांसाठी लवकरच लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

कोवॅक्सिन लसीची मुलांवरील चाचणी ही दिल्ली आणि पाटणातील एम्समध्ये केली जाईल. यासोबतच देशात नागपूरसह इतर विविध ठिकाणांवर केली जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here