: नांदेड जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असून आता आरोग्य विभाग लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. मात्र नांदेडमध्ये करोना लस दिली जात नसल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या नगरसेवकाने आरोग्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

ही धक्कादायक घटना काल शहरातील श्यामनगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात घडली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मला ओळखत नाहीस का, असं विचारत नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘लस घेण्यासाठी नागरिक रांगेत थांबले आहेत… लस का दिली जात नाही?’ असा प्रश्न विचारत पिंपळे यांनी आरोग्य कर्मचारी सुरेंद्र तलेगावकर यांना मारहाण केली.

या मारहाणीचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध करत काम बंद आंदोलन केलं आहे. मारहाण करणाऱ्या नगरसेवक पिंपळेवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधीही महाराष्ट्रात करोना योद्ध्यांना मारहाण करण्यात आलेल्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी आमदार पुत्राने आरोग्य कर्मचाऱ्यावर हात उचलला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here