आता राजधानी दिल्ली- एनसीआरसह ( ) उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. हवामान विभागाचे अधिकारी कुलदीप श्रीवास्व यांनी यासंदर्भात माहिती दिली. चक्रीवादळामुळे दक्षिण राजस्थानमध्ये पाऊस पडतो आहे. आता हे वादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत आहे, असं त्यांनी सांगितलं.
चक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत जाईल. यामुळे ते पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस पडेल. दिल्लीच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, असं श्रीवास्तव म्हणाले.
हवामान विभागाने बुधवारसाठी एनसीआरमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. यानुसार ५०- ६० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील आणि पाऊसही पडेल. वादळी वारे उत्तराखंडच्या दिशेने पुढे जातील. पुढच्या दोन दिवसांत हिमाचल प्रदेशातही पाऊस पडेल. वादळामुळे उत्तर भारताच्या काही भागांवरही परिणाम होईल. काही भागांमध्ये पाऊसही पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times