वाचा:
काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला रावेर मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष , जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य २० ते २५ जणांची उपस्थिती होती.
वाचा:
करोनाच्या काळात कार्यकर्त्यांच्या गर्दीत बैठक घेतल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका देखील झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस प्रशासनाकडून दाखल झाली फिर्याद
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times