मुंबई: अभिनेता याची प्रमुख भूमिका असलेला ‘ : युवर मोस्ट वॉन्टेड भाई ’ हा चित्रपट झी ५ ॲपवरून चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून ॲपवरून चित्रपट डाऊनलोड करण्यात आला असून सोशल मीडियावर हा चित्रपट विकण्याच्या जाहिराती दिल्या जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर झी च्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीवरून मुंबईतील वरळी येथील मध्य नियंत्रण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( )

वाचा:

राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट १२ मे रोजी दुबईतील सिनेमागृहात तर १३ मे रोजी झी प्लेक्सच्या होम टू थिएटर आणि ४ डायरेक्ट टू होम प्रोव्हाडर्स मार्फत प्रदर्शित करण्यात आला. प्रसारणाचे सर्व हक्क राखून ठेवले असताना जवळपास ५०० जीबीचा हा चित्रपट सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कुणीतरी डाऊनलोड केला. व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मीडियावर हा चित्रपट पाहण्यासाठी जाहिराती व्हायरल झाल्या त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. झी एंटरटेनमेंटच्या कायदेशीर सल्लागार यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

वाचा:

अशी पकडली गेली चोरी

या व्यक्तीने हा चित्रपट डाऊनलोड केल्याचे उघड झाले आहे. त्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक जाहिरात केली होती. ज्यांना राधे चित्रपट हवा आहे ते ५० रुपये देऊन खरेदी करू शकतात, असे त्यात त्याने नमूद केले होते. तिथेच तो फसला. झी च्या वितरण विभागातून राघव याच्याशी संपर्क करण्यात आला. चित्रपटाची मागणी त्याच्याकडे केल्यावर त्याने ५० रुपये पाठवायला सांगितले. हे पैसे पेटीएमद्वारे पाठवल्यानंतर राघवने राधेचे पायरेटेड व्हर्जन पाच भागात सेंड केले. त्यानंतर हे पाचही भाग फ्रान्स येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आले. त्यांच्या अहवालात हा चित्रपट झी ५ अॅपवरून डाऊनलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून त्याआधारे सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी राघव तसेच दोन मोबाइलधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here