पोलीसांनी घोटा येथील रहिवासी युवराज उद्धव नाखले (४२) याला अटक केली. पोलिसांनी घोटा शिवारात असलेल्या नाखलेच्या शेतातील गोदामावर छापा टाकला. त्यावेळी ब्लास्टींग मशीन बसवलेला एक ट्रॅक्टर तसेच गोदामातून १३०० जिलेटिनच्या कांड्या आणि ८३५ नग डिटोनेटर सापडले आहे. असा एकूण ४ लाख ३५ हजार ६२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या स्फोटकांबाबत पोलिसांनी नाखलेला विचारणा केली. स्फोटकांचा पुरवठा मार्डी येथील ईश्वर मोहोड याने केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नाखलेकडे स्फोटक बाळगण्यासाठीचा कोणताही परवाना पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे नाखलेला तसेच जप्त केलेले स्फोटकं आणि ट्रॅक्टरसुध्दा कुऱ्हा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाखलेविरुध्द गुन्हा दाखल केला असून तो या स्फोटकांचा वापर विहिरींमध्ये ब्लास्टींग करण्यासाठी करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times