सोलापूर: उजनी धरणात पाण्याची उपलब्धता नसताना इंदापूर मतदारसंघातील जनतेला ५ टीएमसी पाणी मिळवून देण्याचे राजकीय आश्वासन इंदापुरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री यांच्या अंगलट आलं आहे. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करुन काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचा खुलासा खुद्द राज्याचे जयंत पाटील यांनी केलाय. त्यामुळं पालकमंत्री दत्तात्रय भरणे तोंडघशी पडले आहेत.

खोरेनिहाय पाणी वाटपानुसार उजनीच्या पाण्याचे यापूर्वीच नियोजन झाले आहे. तरीही खडकवासला धरणातुन पुण्यात जे बिगर सिंचन वापरासाठी ११.५ टीएमसी पाणी राखीव आहे. हे पाणी वापरात आल्यानंतर पुणे शहरातून सांडपाण्याच्या रूपाने जे पाणी भीमा नदी पात्रात येते. त्याच्या बदल्यात ३ टीएमसी पाणी पाळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चालवला होता. मात्र प्रत्यक्षात हे सांडपाणी दौडच्या आगोदर असलेल्या ४ (पेडगावच्या) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्येचं अडते. पुढे ते उजनी धरणांत येत नाही. याबाबतचा सविस्तर अहवाल सोलापूरच्या जलसंपदा विभागाने यापूर्वीच सरकारला दिला आहे.

शिवाय धरणातील उपलब्द पाण्याबाबत नाशिकच्या नियोजन जलविज्ञान संस्थेचा पाण्याच्या उपलब्धते संदर्भातली नाहरकत प्रमाणपत्र मिळणार नव्हती. तरीही पालकमंत्री पुण्याचा पाण्याचे भांडवल करत उजनीच्या पाण्यावर हक्क सांगत होते. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात त्यांच्याविषयी कमालीचा असंतोष पसरला होता. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत संघर्ष समिती उभा करून आंदोलन सुरू केले. त्याला राजकीय नेत्यांचा पाठींबा होता. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढला होता. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांनाच या विषयावर खुलासा करावा लागला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून मिळवलेला आदेश रद्द करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री यांनी म्हंटलंय. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन करणारे पत्र सोशल मीडियात व्हायरल केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here