चंदीगडः पंजाब काँग्रेसमधील गटबाटी आता चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू ( ) यांनी मुख्यमंत्री कॅप्टन ( ) यांच्यावर निशाणा साधला आहे. खरं बोलल्यामुळे पक्षातील आपल्या सहकाऱ्यांना धमकावलं जात आहे, असा आरोप सिद्धू यांनी केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार संदीप संधू यांनी धमकावल्याचा आरोप काँग्रेस आमदार परगट सिंग यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सिद्ध यांचे हे वक्तव्य आले आहे.

धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेच्या घटनेवरून राज्य सरकारला प्रश्न केल्याने आपल्याला धमकावण्यात आलं आहे. तर अमरिंदर सिंग आणि सिद्ध यांनी धार्मिक ग्रंथाच्या अवमान प्रकरणी चौकशीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेविरोधात कोटकपुरामध्ये २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांच्या एसआयटीने हायकोर्टात गेल्या महिन्यात तपास अहवाल सादर केला. हा अहवाल कोर्टाने रद्द केला.

कोटकपुरा गोळीबार प्रकरणी अमरिंदर सिंग हे जबाबदारी झटकत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे. सिद्धू यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरून परगट सिंग यांचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट केला. ट्वीटमधून सरकारला लक्ष्य केलं. ‘लोकांचे मुद्दे उपस्थित करून मंत्री, आमदार आणि खासदार पक्ष बळकट करत आहेत. आपली लोकशाहीती कर्तव्य पूर्ण करत आहेत. आपल्या घटनात्मक अधिकारांचा उपयोग करत आहेत. पण खरं बोलणारी प्रत्येक व्यक्ती तुमची शत्रू ठरतेय’, असं सिद्धू यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

पक्षातील आपल्या सहकाऱ्यांना धमकावून तुम्हाला असलेली भीती आणि असुरक्षितता समोर येतेय, असं सिद्धू म्हणाले. पक्षात कुठलीही गटबाजी नसल्याचं काँग्रेसकडून मंगळवारी सांगण्यात आलं होतं. पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, असं पक्षाने म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here