मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ()यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. कारण, आताही त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धनंजय मुंडे यांच्या संपत्तीबद्दल सगळी माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्या सगळ्या संपत्तीबद्दल माहिती दिली असून मुंबईत आमदारांसाठी बांधली जाणारी इमारत बांधू नका, त्यासाठी ऐवढा कोट्यावधी पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

खरंतर, या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांना आणखी काय अडचणींचा सामना करावा लागणार? विरोधक यावर काय प्रतिक्रिया देणार? इतकंच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काही उत्तर देणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्त समोर येतात.

काय म्हणाल्या करुणा मुंडे?
‘मी एक आमदाराची पत्नी आहे. धनंजय मुंडे माझे पती हे मंत्री आहेत. ते जेव्हा विधानपरिषदेवर आमदार होते तेव्हापासून त्यांचे परळीमध्ये तीन बंगले आहेत. एक फार्म हाऊस आहे, पुण्यात दोन बंगले आणि मुंबई दोन फ्लॅटही आहेत. इतकंच काय तर आम्हाला सरकारी बंगलाही मिळाला आहे. त्यामुळे आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही. त्यातून सामान्यांना मदत करा’ अशी विनंती करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

दरम्यान, याआधीही करुणा मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट करत लवकरच त्यांची प्रेमकथा मांडणारं पुस्तक प्रकाशित करणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे आधीच राजकीय चर्चांना उधाण आलं असताना आता या नव्या पोस्टमुळे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय लिहलं आहे फेसबूक पोस्टमध्ये?
‘# Karunadhananjaymundeमाझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जिवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असुन त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे’ असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एक फोटोही शेअर केला असून त्यामध्ये एक आश्चर्यजनक प्रेमकथा असंही त्यावर लिहण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here