म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्यात ”च्या रुग्णांची संख्या वाढत असून, त्याचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही. याचसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत. या रुग्णांना आवश्यक इंजेक्शन मोफत देण्याचे आदेशही राज्याच्या आरोग्य खात्याने संबंधित जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आरोग्य विभागाच्या अध्यादेशामुळे राज्यातील अनेक करोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात ‘म्युकरमायकोसिस’ची तीव्रता वाढत असून, त्यासाठी कान- नाक- घसा, नेत्ररोगतज्ज्ञ, फिजिशियन, न्यूरोसर्जन; तसेच अन्य तज्ज्ञांची गरज भासते. त्यासाठी लागणारा खर्च जास्त असून, सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये, यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांना ही योजना लागू असलेल्या सर्व खासगी, सरकारी रुग्णालयांत ‘म्युकरमायकोसिस’वर उपचार करण्यात येतील. ‘ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत अंमलात राहील. त्यानंतर आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येईल,’ असे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

इंजेक्शनही मोफत

‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारात अँटीफंगल अम्फोटेरिसीन बी नावाचे इंजेक्शन सध्या कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. ते महाग आहे. हे इंजेक्शन राज्य सरकारच्या नियमानुसार आरोग्य अधिकाऱ्यांकडून कार्यपद्धतीनुसारच उपलब्ध करून देण्यात यावे; तसेच योजनेंतर्गत रुग्णालयातील पात्र रुग्णास मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असेही आदेश जारी करण्यात आले आहेत.

‘अम्फोटेरिसीन बी’सारखी इंजेक्शने उपलब्ध करण्याची सर्व जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांची आहे. अंगीकृत रुग्णालयांना खर्चाची प्रतीपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here