मुंबईः गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला झोडपून काढल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून तौक्ते चक्रीवादळानं गुजरात किनारपट्टीच्या विविध भागांना तडाखा दिला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळं झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी सकाळी गुजरात व दिवचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या खासदार यांनीही यावरुन भाजपला टोला लगावला आहे. ()

‘तौक्ते चक्रीवादळामुळं गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत नुकसान झाले आहे. या संकटाच्यावेळी टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात यांचे गृहराज्य आहे. त्यामुळं ते फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून सर्व संकटाशी मुकाबला करण्यास समर्थ आहेत आणि खंबीरपणे ते राज्य करत आहेत. सर्व संकटाशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. त्याची बहुतेक पंतप्रधानांना खात्री पटल्यामुळं जिथं जास्त नुकसान झालं आणि जिथं कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत पंतप्रधान करत आहेत,’ असं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘उद्या निवडणूक लागली तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल, असं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राऊतांनी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांना ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे. याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळं भाजपला ४०० काय ५०० जागाही मिळू शकतात, असं मिश्किल उत्तर राऊतांनी दिलं आहे. तर, सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचं आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here