मुंबई : ‘मुंबई हाय’ इथे बुडाल्याले बार्जमधील ओएनजीसीच्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह हाती आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चक्रीवादळामुळे घडलेली ही सगळ्यात मोठी दुर्घटना आहे. नौदल, तटरक्षक दलासह अन्य सागरी कंपन्यांच्या नौका सोमवारी संध्याकाळपासून इथे २७३ कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करीत असून त्यापैकी १८८ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. तर उर्वरित ५१ जण अद्याप बेपत्ता असल्याने चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १८८ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे तर अपडेटनुसार, एकूण २६१ कर्मचारी होते, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. खोल समुद्रातील ‘मुंबई हाय’ येथील हीरा तेल विहीर परिसरात ओएनजीसीचा ‘पापा-३०५’ हा बार्ज आहे. तेथे अॅफकॉन्स कंपनीकडून तीन विहिरींवर काम सुरू आहे.

यासाठी तब्बल २७३ कर्मचारी तेथे कार्यरत होते. परंतु ‘तौक्ते’ चक्रीवादळादरम्यान या भागात सोमवारी समुद्राला उधाण आले. परिणामी बार्जला धक्के लागणे सुरू झाले. त्यामुळे बार्ज प्रमुखांनी बचावाचा संदेश पाठवला. त्यानुसार नौदलाने सोमवारी दुपारनंतर बचाव सुरू केला.

नौदलाने सुरुवातीला ‘आयएनएस कोलकाता’ व ‘आयएनएस कोची’ या विनाशिका श्रेणीतील युद्धनौका धाडल्या. या दोन्ही विनाशिकांनी धो-धो पाऊस, सोसाट्याचा वारा अशा परिस्थितीत खवळलेल्या समुद्रात रात्रभर बचावाचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे अत्यंत अवघड होते. त्याचदरम्यान, हा बार्ज लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रात बुडाला. तो बुडत असतानाच तेथील अनेक कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या.

अनेक कर्मचारी खवळलेल्या समुद्रात रात्रभर गटांगळ्या खात, पोहत होते. नौदलाच्या युद्धनौका त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यातील मोजक्या कर्मचाऱ्यांना वाचवता आले. त्यामुळे नौदलाने सकाळी मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे.

दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जहाजेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी काही नंबर जारी करण्यात आले आहेत. यावर संपर्क करून नातेवाईक माहिती मिळवू शकतात.

‘या’ क्रमांकावर संपर्क साधू शकतात
AFCONS हेल्पडेस्क आणि समर्थन कार्यसंघ:

करनदीप सिंग – +919987548113, 022-71987192

प्रसून गोस्वामी – 8802062853

ONGC हेल्पलाइन : 022-2627 4019, 022-2627 4020, 022-2627 4021

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here