मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये रुग्णवाहिकेतून घेऊन जातानाच करोना रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी चालकास रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले आणि नातेवाईकांनी चक्क तिथून पळ काढला. जिल्हा रुग्णालय परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
करोना झाल्यामुळे अनेक नाती दुरावल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील पण मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक थेट फरार झाले. यामुळे चालकालाही मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये या घटनेविषयी पोलीसही तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, करोना नियंत्रणासाठी लागू केलेला कडक लॉकडाउन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या २० दिवसांपासून शहरातील करोनाबाधितांचे प्रमाण झपाट्याने घटले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील ५० टक्के बेड रिक्त झाल्याने नाशिक वेगाने करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
खासगी आणि महापालिका मिळून एकूण सात हजार ७०० पैकी साडेतीन हजार बेड सध्या रिक्त झालेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णंसख्या साडेसात हजारांपर्यंत खाली आली असून, नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक ९५.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे १८ दिवसांतच नाशिकमधील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा २० हजारांनी घटल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times