औरंगाबाद: ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला म्हणू नका,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष यांनी आज केलं. औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ करण्यासही त्यांनी अनुकूलता दर्शवली.

मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.

वाचा:

राज ठाकरे म्हणाले…

>> औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे? चांगले बदल झालेच पाहिजेत.

>> मी भूमिका बदलली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले आहेत.

>> भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास होण्याशी कारण आहे. तो कुणाकडं आहे याला माझ्या दृष्टीनं काही महत्त्व नाही.

>> आपल्याकडं भेटीचं रूपांतर लगेचच मैत्रीत केलं जातं. शरद पवारांशी चांगले संबंध आहेत. हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे.

>> मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर येईन, धर्माकडं वाकडं बघाल तर हिंदू म्हणून समोर येईन.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here