मुंबई : गेल्या वर्षापासून करोनामुळे मनोरंजन विश्वावर अवकळा पसरली आहे. त्यातून अजूनही मनोरंजन विश्व पुरते सावरलेले नसताना नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा कोलमडून पडले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे अनेक मालिका, सिनेमांच्या सेटचे खूपच नुकसान झाले आहे. आणि यांच्या आगामी ” सिनेमाच्या सेटला या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. चक्रीवादळामध्ये सिनेमाच्या सेटचे खूप नुकसान झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये अनेक सेट उडून गेले आहे. त्यामध्ये सलमान खानच्या ‘टायगर ३’ या सिनेमाचाही समावेश आहे. गोरेगाव येथे असलेल्या फिल्मसिटीमध्ये ‘टायगर ३’ या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. परंतु या चक्रीवादळामध्ये या सिनेमाचा सेट उडून गेला असून खूप नुकसान झाले आहे.

निर्माता- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाच्या सेटचे मात्र या वादळामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. गेल्या वर्षी हा संपूर्ण सेट पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना केली गेली होती. ती तशीच कायम असल्याने सिनेमाचा संपूर्ण सेट सुरक्षित राहिला आहे. करोनाची दुसरी लाट देशात पसरू लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे या सिनेमाचे चित्रीकरण थांबले आहे.

मुंबईत मालिका आणि सिनामांच्या चित्रीकरणाला बंदी असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण सिलवासा येथे सुरू आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका मुंबई आणि गुजरातच्या किना-याला सोमवारी १७ मे रोजी बसला. या चक्रीवादळाचा तडाखा सिलवासा येथे सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचे चित्रीकरणालाही बसला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here