मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा ग्राफ उतरता असून आजही नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५१ हजार ४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही मोठा असून आज राज्यात ५९४ रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले. ( )

वाचा:

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्याचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ लाखांपर्यंत खाली आली आहे. ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून आता ९१ टक्क्यांच्यावर गेले आहे.

वाचा:

करोनाची आजची स्थिती:

– राज्यात आज ५९४ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
– सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.
– आज राज्यात ३४,०३१ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ५१,४५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आतापर्यंत एकूण ४९,७८,९३७ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०६ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत ३,१८,७४,३६४ करोना चाचण्या पूर्ण.
– एकूण ५४,६७,५३७ (१७.१५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
– सध्या राज्यात ३०,५९,०९५व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
– २३,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.

वाचा:

४ लाख १ हजार ६९५ सक्रिय रुग्ण

राज्यात सध्या करोनाचे ४ लाख १ हजार ६९५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ६७ हजार २९५ रुग्ण जिल्ह्यात आहेत. मुंबईत ही संख्या आज ३० हजारच्या खाली आली. आजच्या नोंदीनुसार मुंबईत २९ हजार ४४५ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात २८ हजार ३८३ तर जिल्ह्यात २३ हजार २७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here