: कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, सुप्रसिद्ध प्रवचनकार, किर्तनकार ह.भ.प.भानुदास महाराज यादव (वय ६५ वर्षे) यांचं करोनामुळे देहावसान झालं आहे. वैंकुठवासी ब्रम्हीभूत गुरुवर्य रामचंद्र महाराज यादव यांचे ते सुपुत्र होते.

गुरुवर्य साखरे महाराज संपादीत सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव, सार्थ चांगदेव पासष्टी यासारख्या अनेक ग्रंथांचे त्यांनी पुनः संपादन व प्रकाशन केले होते. आपल्या किर्तन, भजन व प्रवचनातून त्यांनी सातत्याने समाज प्रबोधन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख होते.

वारकरी साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते वारकरी जीवन पुरस्कार आणि स्वामी अमलानंद भक्त मंडळाच्या वतीने स्वामी अमलानंद सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या मागे पत्नी,भाऊ ह.भ.प.महादेव तथा बंडा महाराज, पुतणे, बहिणी, मेहुणे, भाचे असा बराच मोठा सांप्रदायिक परिवार आहे.

दरम्यान, कोल्हापुरात आज कडक लॉकडाऊनचा चौथा दिवस असला तरीही रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. आजही 1 हजार 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. दरदिवशी नव्या करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एक हजाराहून अधिक आढळत आहे. त्यामुळे आगामी काळात करोना संसर्गाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान शासन-प्रशासनासमोर असणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here