बीसीसीआयने यावेळी महिलांच्या करारामध्ये तीन गट केले आहे. पहिल्या ‘अ’ गटामधील खेळाडूंना वार्षिक ५० लाख रुपये मिळणार आहे. या गटामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाचा ‘अ’ गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये पुनम यादवचाही समावेश आहे. या ‘अ’ गटामध्ये तीन खेळाडूंचाच समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या ‘ब’ गटातील खेळाडूंना वर्षाला प्रत्येकी ३० लाख रुपये मिळतात. ‘ब’ गटामध्ये भारताची माजी कर्णधार मिताली राज, भारताची सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलान गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटीया, जेमिमा रॉड्रीग्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या ‘क’ गटातील खेळाडूंना वार्षिक १० लाख रुपये एवढी रक्कम मिळत असते. ‘क’ गटामध्ये यावेळी बीसीसीआयने मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पुजा वस्रकार, हार्लिन देओल, प्रिया पुनिया आणि रिचा घोष यांचा समावेश केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times