गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. याचा सकारात्मक परिणाम झाला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने घसरली आहे. सध्या शहरात करोनाच्या २९ हजार ६४३ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण दुप्पटीचा दरही २६९ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
मुंबईत आतापर्यंत ६ लाख ४६ हजार १६३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के इतका झाला आहे. कोविड वाढीचा दर ( १२ मे ते १८ मे) ०.२५ टक्के इतका नोंदवण्यात आला.
राज्यात काय आहे स्थिती?
महाराष्ट्रात बुधवारी ५१ हजार ४५७ करोना रुग्ण बरे झाले, तर दिवसभरात ३४ हजार ३१ नवे करोना बाधित आढळले. गेल्या २४ तासात ५९४ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६८ मृत्यू नोंदवले गेले आहेत.
दरम्यान, राज्यात कालपर्यंत २ कोटी २ लाख ३१ हजार १८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.१८ मे २०२१ रोजी १ लाख २४ हजार ६६१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times