नवी दिल्लीः देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ लाखांवर नवीन रुग्ण आढळून आले होते. आता गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी होत आहे. पण मृत्यू का कमी होत नाहीए? असा प्रश्न उपस्थित ( ) होतोय. देशात ८ मे रोजी ४ लाख १ हजारांवर करोनाचे नवे रुग्ण आढळले होते. त्यावेळी मृत्युंची संख्या ही ४१०० हून अधिक होती. पण देशात बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख ६७ हजारांवर नवीन रुग्ण आढळले. तरीही मृत्युंची संख्या ही ४५२९ इतकीच आहे. ही संख्या जगात एका दिवसात होणाऱ्या मृत्युंमध्ये सर्वाधिक आहे.

देशात ८ मे नंतर करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण मृतांचा आकडा वाढत असून घाबरवणारा आहे. आतापासून ११ दिवसांपूर्वी संसर्ग झालेल्यांपैकी १ टक्के रुग्ण असे होते ज्यांची प्रकृतीनंतर चिंताजनक बनली आणि त्यांच्या मृत्युची भीती अधिक होती. संसर्गामुळे अशा रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी किंवा ते बरे होण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो, असं जाणकारांचं मत आहे. यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. ज्यांना संसर्ग होतो त्यापैकी १ टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनते. अशा चिंताजनक असलेल्या रुग्णांना १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांचा मृत्यू झाला तर त्यासाठी कमीत कमी १०-१२ दिवसांचे अंतर असते. हे अंतर कधी कधी ते २० दिवस हॉस्पिटलमध्ये असतात आणि त्यांचा मृत्यू होतो, असं साथीच्या रोगाचे तज्ज्ञ डॉक्टर जुगल किशोर यांनी सांगितलं.

ज्या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या अधिक आहे तिथे मृतांची संख्याही अधिक नोंदली जात आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, यूपीत करोना मृत्युंची संख्या अधिक आहे. या राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये लक्षणं नसलेले किंवा कमी लक्षणं असलेले रुग्ण असतील तर ते बरे होतात. पण यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनल्यास मृत्युंची संख्या वाढते.

– १५ मे रोजी ३, २६, ०८९ रुग्ण तर ३८९० मृत्यू

– १६ मे रोजी ३, ११, १७० रुग्ण तर ४०७७ मत्यू

– १७ मे रोजी २, ८१, ३८६ रुग्ण तर ४१०६ मृत्यू

– १८ मे रोजी २, ६३, ५३३ रुग्ण तर ४३२९ मृत्यू

– १९ मे रोजी २, ६७, ३३४ रुग्ण तर ४५२९ मृत्यू

वरील आकडेवारी ही गेल्या ५ दिवसांतील देशात करोनाचे नवीन आढळून आलेले रुग्ण आणि वाढत्या मृत्युंची आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here