सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत आणि पालक मंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्त भागाची ( ) पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावाला वादळाचा तडाखा बसला आहे. या गावाला दोन्ही नेत्यांनी भेट देऊन तालुक्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( ) जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत ( ) यांनी यावेळी दिली.

वैभववाडी तालुक्यातील ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात भेट दिली. यानंतर ग्रामपंचायत नाधवडे येथे तालुक्यातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली.
या वादळामध्ये वैभववाडी तालुक्यातील जवळ जवळ ७५० घरांचे नुकसान होऊन शाळांचे आणि इतर नुकसान पाहता मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. आंबा, काजू , केळी व इतर बागायतदारांचे देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेवून तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके यांनी पंचनामा केला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here