नवी दिल्लीः देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत ( ) आहे. देशात रोज अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. करोनाची चाचणी करण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा आणि समस्यांचा सामना करावा लागतोय. रुग्णसंख्या वाढती असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अशातच आता आयसीएमआरने ( ) एका अशा टेस्ट किटला मंजुरी ( ) दिलीय. ज्याने आपण घरीच करोनाची चाचणी करू ( ) शकतो. आयसीएमआरने रॅपिड अँटिजन टेस्टसाठी एका किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या सहायाने नागरिक घरीच करोनाचे नाकाद्वारे नमुने घेता येणार आहेत. यासाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

अशा आहेत सूचना…

– फक्त लक्षणं असलेल्या नागरिकांना याद्वारे घरीच चाचणी करता येईल. तसंच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अले असतील

– घरीच करण्यात येणारी ही चाचणी कंपनीने दिलेल्या म्युन्युअलनुसार केली जावी

– घरीच करोना चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून मोबाइल अॅप डाउनलोड करावं लागेल

– मोबाइल अॅपद्वारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल

– जे घरीच चाचणी करणार आहेत त्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटा काढावा लागेल आणि ज्या फोनवर अॅप डाउनलोड केले आहे त्याच फोनवर हा फोटो काढावा लागेल

– मोबाइल फोनवरील डाटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाईल

– रुग्णाची गोपनियता कायम ठेवली जाईल

– या टेस्टद्वारे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल ते पॉझिटिव्ह समजले जातील आणि त्यांना इतर कुठल्या टेस्टची गरज पडणार नाही

– जे नागरिक पॉझिटिव्ह आढळतील त्यांना होम आयसोलेशनबाबत आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.

– लक्षणं असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना RTPCR टेस्ट करावी लागेल

– सर्व रॅपिड अँटिजन निगेटिव्ह असलेल्यांना लक्षणं नसलेली किंवा संशयित कोविड रुग्ण मानले जाईल आणि जोपर्यंत RTPCR टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्येच रहावं लागेल

– होम आयसोलेशन टेस्टींग किटसाठी MY LAB DISCOVERY SOLUTION LTD या पुण्यातील कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे

– या किटचे नाव COVISELF (Pathocatch) असे आहे

– या किटद्वारे नागरिकांना नाकाद्वारे म्हणजे नेजल स्वॅब घ्यावा लागेल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here