दिल्लीः पाकिस्तानी सैन्याने पूंछ सेक्टरमध्ये शस्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसं उत्तर दिलं. पण पाकच्या गोळीबारात एक नागरिक ठार झालाय. तर चार जण जखमी झालेत. पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असताना पाकने गोळीबार केल्याने सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

पुलवामामध्ये गेल्या वर्षी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांची बस उडवली होती. यात ४० जवान शहीद झाले होते. या जवानांना भारतात आदरांजली वाहण्यात येत असताना पाकने मात्र पूंछमध्ये गोळीबार केला. यापूर्वी पाकने ८ फेब्रुवारीलाही गोळीबार केला होता. यात एक भारतीय जवान शहीद झाला होता. भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भारत-पाकमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यब पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानसाठी काश्मीर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढचं तुर्कीसाठीही आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तय्यब एर्दोगान यांनी केलंय. यापार्श्वभूमीवर पाक सैन्याने हा गोळीबार केल्याने तणाव वाढू शकतो. तर भारत पुढच्या काही दिवसांमध्ये मोठी लष्करी करवाई करू शकतो, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आएशा फारूकी यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यापूर्वी म्हटलंय. पण याचं ठोस कारण त्यांनी दिलं नाही. एर्दोगान पाकिस्तान भेटीवर असताना भारत लष्करी कारवाई करण्याच्या प्रयत्न आहे, असा आरोप फारूकी यांनी केलाय.

भारताने कुठलीही कारवाई केली तर पाकही जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी धकमी पाक प्रवक्त्या फारूकींनी दिली. तुर्की काश्मीर मुद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेचं समर्थन करत असल्यामुळे भारताला पोटदुखी होते, अशी टीकाही त्यांनी केली. भारत अमेरिकेकडून हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टम) विकत घेणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला १.८ अब्ज डॉलर्समध्ये एअर डिफेन्स सिस्टम विकण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अतिशय चुकी आहे. यामुळे दक्षिण आशियात शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होईल, असं आएशा फारूकी म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here