हमास नेत्यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनसोबत बोलताना सांगितले की, येत्या २४ तासांमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होऊ शकते. दरम्यान याबाबत इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. एक दिवसांपूर्वीइस्रायल-पॅलेस्टाइनचा संघर्ष थांबणार? शस्त्रसंधी लागू होण्याची शक्यताच हमासचे राजकीय विभागाचे नेते मूस अबू मारजोक यांनी सांगितले की, येत्या एक दोन दिवसांमध्ये शस्त्रसंधी लागू होऊ शकते. त्याबाबतची घोषणा होण्याची त्यांनी शक्यता वर्तवली होती.
वाचा:
वाचा:
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाचा विरोध करत असल्याचे अमेरिकेने बुधवारी म्हटले. बायडन प्रशासनाच्या प्रयत्नांतून हे संकट संपुष्टात येऊ शकते असेही अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेने इस्रायल आणि पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या हिंसाचार थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रात दाखल झालेल्या प्रस्तावाला चार वेळा ब्लॉक केले. त्यानंतर आता फ्रान्सने प्रस्ताव तयार केला आहे. इस्रायलकडून बुधवारी, गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरूच ठेवले. तर. पॅलेस्टाइनमधून इस्रायलवर हल्ले करण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times