नाशिक : ‘मी शांत आहे ही महाराजांची शिकवण आहे. पण मला आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतील. मी आक्रमक होण्यासाठी तयार आहे. पण आधी मार्ग काय काढणार ? हे सांगा’ अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. माझ्यासाठी मराठा समाज महत्त्वाचा आहे, आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशी ठाम भूमिकाही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा सुरू आहे. येत्या 27 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना भेटणार असून यानंतर यानंतर मुंबईत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. तर तोपर्यंत ‘माझी सगळ्या आमदार, खासदारांना वॉर्निंग आहे, मराठा मराठा समाजालाही विनंती आहे की 27 मेपर्यंत शांत रहा’ असं आवाहन यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, ‘माझी भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणी जनतेची भूमिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकत आहेत. पण मराठा समाजाला याचं घेणेदेणे नाही. टिमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहेत. मी छत्रपतींचा वंशज आहे. मला कोणी शिकवण्याची गरज नाही.’ असा घणाघातही यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी केली.

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– मराठा आरक्षणासाठी जे हातात आहे ते करा हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं

– नौकरी देण्यात काय अडचण

– आताच्या सरकारची भूमिका अयोग्य

– माझी भूमिका ही समाजाची भूमिका

– मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 वेळा भेटीसाठी परवानगी मागितली

– सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका

– जबाबदारी झटकू नका, समाजाला दिलासा द्या

– आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही

– मला आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतील

– 102व्या घटनादुरुस्ती वर 27 मे ला बोलणार

– इतर राज्यात आरक्षण मिळालं, मग महाराष्ट्रात का नाही ?

– राज्य सरकारला मी स्वतः सूचना दिल्या होत्या. माझ्या काही सूचना त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडल्या नाही.

– आता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र निर्णय घ्यावा, माझ्यासाठी मराठा समाज महत्वाचा

– 27 मे पर्यंत सरकारने अभ्यास करावा, चिंतन करावं

– उद्या माणसं मेले तर जबाबदार कोण ?

– मी समाजाला दिशाभूल करत नाही दिशा देतो

– राज्य सरकारच्या हातात काही गोष्टी आहे

– नियुक्तीची प्रक्रिया का रखडवताय

– प्रलंबित असलेल्या नौकऱ्या तातडीनं मार्गी लावा

– पदोन्नती आरक्षण 7 मे चा GR, सुप्रीम कोर्ट गाईडलाईननुसार योग्य

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here