संगमनेर: पोलिस तपास राज्याकडेच असावा. तो अधिकार राज्य सरकारचाच आहे. याबाबत आमचं मत पक्क आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी तपास एनआयकडे देण्यास कोणी परवानगी दिली असेल तर आम्ही चर्चा करू मात्र इतर तपासही केंद्र शासनाकडे जायला सुरूवात होईल ते राज्य शासनासाठी योग्य नसल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे शुक्रवारी ते ‘मटा’शी बोलत होते. कोरेगाव भीमाचा तपास एनआयकडे देण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनी सहमती दिल्याने आता शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. या प्रश्नावर उत्तर देताना बाळासाहेब थोरातांनी हे वक्तव्य केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेवरून भारतीय जनता पार्टी राजकारण करत आहे तसेच त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्याबाबत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला असल्याने आता आणखी खुलासा करण्याची गरज नसल्याचेही थोरातांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. आरएसएस आपला प्रचार प्रसार करण्याचा कायमच कुठेना कुठे प्रयत्न करत असतो. मात्र जे विद्येचे माहेरघर आहे तिथे तत्वज्ञान नको. तिथे राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या तत्वज्ञानाचा विचार व्हावा, चर्चा व्हावी हे आमचं मत असून पुणे विद्यापीठात आरएसएसचा प्रचार करण्यासारखे प्रकार होऊ नयेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here